अधोरेखित ऑनलाइन डेस्क । गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.पारंपारिक वाद्यांचा वापर करून आणि जयघोष करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाची स्थापना केली.पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भाविकांनी भर दिल्याचे दिसून आले.
सकाळपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मोरया मोरयाचा गजर सकाळपासूनच कानी पडत होता.भक्तिमय वातावरणात भाविकांनी आपपल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना केली.तर सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली.पूजेसाठी ताजी फुले, पूजासाहित्य घेण्यासाठी नागरिकांनी सकाळी गर्दी केली होती.आज सकाळच्या टप्प्यात सर्वत्र खरेदीसाठी मोठी खरेदी उसळली.बाप्पाला घेऊन येणाऱ्या गणेश भक्तांमध्ये उत्साह ओसांडत असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे या दरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये,तचेच मिरवणूका आणि विसर्जना दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनासह,पोलीसांनी चोख व्यवस्था केली आहे.
हेही वाचा – ‘गणेश चतुर्थी’ : शास्त्र काय सांगते?…जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त
मुंबई,ठाणे,पालघर,नवी मुंबई,पुणे,सांगली,सातारा,कोल्हापूरसह राज्याच्या इतर जिल्ह्यातही गणशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.घरगुती तसेच सार्वजनिक उत्सव मंडळांच्या गणेशमुर्तींचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकांसह स्वागत केले जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.कोकणातही गणेशोत्सवाचा जल्लोष आहे.रायगड रत्नागिरी,सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी मोठ्याप्रमाणात चाकरमानी आपापल्या गावी आले आहेत.गणेश भक्त पारंपरिक पद्धतीनुसार समुहानं गणरायाला वाजत गाजत आपापल्या घरी घेऊन जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
दुष्काळाचे सावट,महागाईचे संकट…तरीही गणेश भक्तांमध्ये उत्साह
प्रत्येकाच्या घराघरात,मंडपा-मंडपात आज मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने श्री गणरायांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे.यंदा घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशोत्सवाला भक्तीचा नवा जोश आला आहे.या गणेश उत्सवात दुष्काळ,महागाईचे संकट असले तरी गणेश भक्त मनोभावे उत्सव साजरा करण्यात असल्याचे दिसून येत आहेत.
बाप्पाच्या आगमनानिमित्त घरोघरी विविध पदार्थांची रेलचेल
बाप्पाच्या आगमनानिमित्त घरोघरी विविध पदार्थांची रेलचेल असते. यात नेवऱ्या (करंज्या), मोदक, शेव, गोडीशेव, चिवडा, चकल्या, शंकरपाळे आदी पदार्थांचा समावेश आहे. दुसरीकडे यासाठी मिठाई दुकानेही सजली असली असून विविध पदार्थांपासून बनविलेले मोदक, बाप्पाचे आवडते लाडू, काजू लाडू, बुंदी लाडू,खोबरे आणि ड्रायफ्रुट लाडू इत्यादी पदार्थ नागरिक एकमेकांना भेटस्वरुपात देत आहेत.