तुमच्या शाळेची वेळ काय आहे. यानुसार प्रत्येक मुलाच्या अभ्यासाची वेळ ही नक्कीच वेगवेगळी असू शकते. जर तुमची शाळा सकाळी असेल तर तुम्ही संध्याकाळची शांततेची वेळ अभ्यासासाठी निवडू शकताय. तसेच तुम्हाला दुपारची वेळ योग्य वाटत असेल तर दुपारी अभ्यास करा. किंवा शाळेतून आल्या आल्या दुपारी तुम्ही शाळेचा अभ्यास करू शकता आणि संध्याकाळी सेल्फ study म्हणजे स्वतः साठी वाचन, लिखाण करू शकता.
माझी शाळा दुपारी 12 ते 5 असायची मग मी काय करायचो शाळेतून आल्या आल्या संध्याकाळी शाळेतला गृहपाठ करायचो आणि रोज सकाळी 6 ते 9 पर्यंत वाचन आणि पाठांतर करायचो. हा सकाळी माझा स्वभ्यास व्हायचा. शाळा आणि तुमचा क्लास सोडून तुमच्याकडे जो रिकामा वेळ आहे यात तुम्ही नेमका कोण कोणता अभ्यास करणार याचे नेमके वेळापत्रक बनवणे गरजेचे आहे. या वेळापत्रकात तुमच्या अभ्यासाच्या प्रत्येक विषयाला योग्य न्याय मिळायला हवाय. वेळापत्रक तुमचा अभ्यास परिपूर्ण करण्यास मदत करू शकतो. म्हणून अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे गरजेचे आहे. यासाठी रोज रात्री आज दिवसभरात मी माझ्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास केलाय काय याचा आढावा घ्या.
तसेच उद्याचे माझे वेळापत्रक कसे असेल यावरही विचार करून झोपा.मित्रांनो जर संपूर्ण दिवसात तुम्ही संध्याकाळी अभ्यासाची वेळ ठरवली आणि दररोज संध्याकाळी 3 तास अभ्यास करायचं ठरवलं तर तुम्हाला बऱ्याचदा कंटाळा येऊ शकतो. तर तुम्ही 5:1 असा ब्रेक टाईम चा फोर्मुला वापरू शकताय. म्हणजे 50 मिनिटे अभ्यास करायचं आणि १० मिनिटांचा ब्रेक. या 10 मिनिटात तुम्ही इतर काही गोष्टी करू शकताय. थोडं उठून उभ राहून चालू शकताय. एखाद गाणं ऐकू शकताय.
परंतु शक्यतो मोबाईल पासून या 10 मिनिटात दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण मोबाईल एकदा हाती आला कि 10 मिनिटाचे 15 आणि 15 चे 20-30 कधी होईल सांगता येत नाही.मित्रांनो मी पण शाळेत असताना अभ्यास करताना एका दिवसात दोन ते तीन विषयांचा अभ्यास करायचो. इतिहास झाला की मराठी मराठीचा अभ्यास झाल्यावर गणित. म्हणजे कंटाळा नाही यायचा. एका दिवसात एकाच विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं तर कंटाळा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.मित्रांनो जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला आपल्यात खूप उर्जा असते. म्हणून सुरुवात अवघड विषयापासून करा. सोप्पा विषय शेवटी घ्या. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वेळ अभ्यास करू शकताय.