सांगली । खरीप हंगाम 2023 साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असून शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी,असे आवाहन वाळवा तालुक्याचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असतांना नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळते.पीक पेरणी अहवालाचा रिअल टाईम क्रॉप डाटा संकलित होण्याच्यादृष्टीने ई-पीक पाहणी महत्वाची असून माहिती संकलित करताना पारदर्शकता येते.
पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभागामुळे कृषी पत पुरवठा सुलभ होतो.पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते.ॲपवर नोंद असल्यास शासनाच्या विविध योजनाच्या लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.त्यामुळे उर्वरीत खातेदारांनी दिलेल्या मुदतीत मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीची उत्सुर्फतपणे नोंद करावी असे आवाहन तहसीलदार उबाळे यांनी केले आहे.
हेही वाचा – अंगणवाडी सेविका व मदतनीसांची तब्बल 17 हजार पदभरती
ई-पिक पाहणी ॲप आता सुरळीतपणे चालत असून 15 सप्टेंबरपर्यंत मोबाईल द्वारे पीक पाहणी लावण्याची मुदतवाढ झाली असून उर्वरित शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपापल्या शेतावर जाऊन पिकाची माहिती नोंदवून घ्यावी.पीक पाहणी न लावल्यामुळे कुणीही शेतकरी बांधव शासकीय अनुदानापासून किंवा शासकीय पीक विम्यापासून वंचित राहिला नको याची सगळ्यांनी कृपया नोंद घ्यावी असे तहसीलदार उबाळे यांनी सांगितले.