सातारा । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गत आठ-दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.आज सकाळी 8 वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 66.90 टीएमसी(64 टक्के) इतका झाला होता.हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 38.35 टीएमसी पाण्याची गरज आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात गत आठ-दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.यामुळे पाणीसाठ्यात दररोज सरासरी सहा ते सात टीएमसीने वाढ होत आहे.
गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 94 मिलिमीटर,नवजाला 130 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जलाशयात प्रतिसेकंद 31 हजार 416 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.ही आकडेवारी 28 जुलै 2023 सकाळी 8 पर्यंतची आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे.हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 38.35 टीएमसी पाण्याची गरज आहे.कोयना नदीत प्रतिसेकंद 2 हजार 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.