22 जुलै 2023
21.32 P.M.
सातारा । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण 44.14 टीएमसी (41.93 टक्के) भरले आहे.जिल्ह्यातील सर्व धरणातील एकूण पाणीसाठा 44.27 टक्के आहे.
सद्यस्थितीत धोम-बलकवडी धरण क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आज सांयकाळपासून दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.सातारा -कास- बामनोली रस्त्यावर सांबरवाडी या ठिकाणी धोकादायक स्थितीतील दगड काढण्यासाठी सोमवारी बोगद्यापासून ते कासला जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्याला देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सर्व प्रशासकीय यंत्रनेकडून जिल्ह्यातील परिस्थतीचा आढावा घेतला.निवारा शेडमध्ये असणा-या नागरिकांना अन्न,शुध्द पिण्याचे पाणी,औषधे आदी सर्व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जमिन उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गाचा अवलंब करावा.रात्री अपरात्री लोंकाना औषध उपचारासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये 24×7 प्राथमिक आरोग्य केंद्रे उपलब्ध राहतील याची आरोग्य यंत्रणेने सर्वोतोपरी दक्षता घ्यावी,असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहेत.
हेही वाचा – सांगली : जिल्ह्यात खरीपाची 21.87 टक्के पेरणी
बलकवडी धरणा खालील कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा
बोगदा ते यवतेश्वर – कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस सोमवारी पूर्णपणे बंद
अतिवृष्टी/भूस्सखलनामुळे सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील सातारा – यवतेश्वर – कास या घाटातील धोकादायक दरड/दगड कोसळल्यास मोठया प्रमाणावर जीवीत व वित्त हानी होणेची शक्यता आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत सांबरवाडी येवतेश्वर घाटातील धोकादायक दरड / दगड फोडण्याची कार्यवाही दि. 24 जुलै रोजी कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग,सातारा यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तरी रविवार दि. 23जुलै2023 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते सोमवार दि. 24 जुलै 2023 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर – कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांनी दिली आहे.तसेच धोकादायक दगड फोडण्याची कार्यवाही सुरु असताना, सदर ठिकाणापासून कमीतकमी 200 ते 300 मीटर परिसरात कोणी व्यक्ती/पशूधनास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाणेस पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.दि. 23 जुलै रोजी रात्री १२ वाजलेपासून दि. 24 जुलै रोजीचे रात्री 12 पर्यंत बोगदा ते यवतेश्वर – कास रस्ता खबरदारीची उपाययोजनेसाठी बंद करणेत येणार असलेने, नागरिकांनी सदर दिवशी पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक करावी असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांनी सांबरवाडी येवतेश्वर घाटातील धोकादायक दरड/दगड फोडण्याची कार्यवाही बाबत सूक्ष्म नियोजन करुन, सुरक्षिततेचे दृष्टीने सर्व प्रकारच्या योग्य त्या खबरदा-या व उपाययोजना कराव्यात,असे निर्देशीत करण्यात आले आहे.
Koyna Dam
Dam Storage :
Discharges
Rainfall in mm: (Daily/Cumulative)