दीप पूजा
सोमवार ,दिनांक 17 जुलै 2023
आषाढ कृष्ण अमावस्या (सोमवतीअमावस्या )
अर्थात,
दीप पूजा …I
दीप पूजनासाठी बंधु भगिनी,मित्र-मैत्रिणी,नातेवाईक,आमचे जातक प्रेमी या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
-प्रभाकर जंगम
शुभं करोति कल्याणमं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धीर्विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते ।
दीपम् हरतुमे पापम् -संध्या दीपम् नमोस्तुते ।
दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार ।
दिव्यास पाहून नमस्कार ।
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते.
आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या.अर्थात दिवे घासून पुसून स्वच्छ करून,दीप पूजन आणि दीप प्रज्वलित करण्याचा दिवस.
सध्याच्या काळानुसार विजेवरील चालणारे दिवे अर्थात बल्व,ट्यूब इ. वरील जळमटे काढून स्वच्छ करण्याचा दिवस म्हणजे दीप अमावस्या होय.
हेही वाचा – शुभसंयोग : श्रावण…अधिक श्रावण मास; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
खरंतर माझ्या मते,अमावस्याची दीपपूजा म्हणजे अंतर्मनातील विकाररुपी जळमटे काढण्याची खरी पूजा होय.
अंतर्मनातील राग,काम,क्रोध मध,मोह,मत्सर हे विचार काढून टाकून सुख,समाधान,शांती आनंद प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे दीपपूजा.
पातंजलयोग दर्शन या ग्रंथात साधन पादात,५२ व्या सूत्रात,पतंजली मुनी म्हणतात,
तत:क्षीयते प्रकाशावरण l
त्यामुळे प्रकाशाच्या आड येणारे आवरण नाहीसे होते,अर्थात ज्ञानावरील पडदा,आवरण दूर होऊन ज्ञान प्राप्त होते.
आपल्या अंतर्मनात मुळातल प्रकाशच प्रकाश आणि उजेडच उजेड आहे.पण,त्या प्रकाशावर अज्ञानरूपी काजळी साठलेली असलेमुळे अतिल प्रकाश दिसत नाही,जसे आपण दिवे, बल्व विजेची ट्यूब साफ करतो,कंदीलाची काच साफ करतो.आत प्रकाश असतोच पण काचेवरील काजळीमुळे आपणास तो दिसत नाही.त्याप्रमाणे अंतर्मनातील अज्ञानाची काजळी काढून टाकून ज्ञानाची ज्योत प्रज्वलीत करून आत्मानुभूतीचा आनंद घेण्याचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्येची खरी दीप पूजा होय.