कोल्हापूर । शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. एम. गुरव व श्रीकांत आडीवरेकर यांनी लिहिलेल्या ‘आनंदी श्रेष्ठत्व ज्येष्ठत्व’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी कोल्हापुरात होत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये मंगळवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ‘आनंदी श्रेष्ठत्व-जेष्ठत्व’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.डी. टी. शिर्के हे तर प्रमुख पाहुणे म्हणून वंदनीय काडसिद्धेश्वर महाराज हे उपस्थित राहणार आहेत.
देशातील झपाट्याने वाढत असलेल्या वृद्धांची संख्या आणि त्यांच्या एकूण साऱ्याच समस्यांचा व त्यावरील उपायांचा अभ्यासात्मक आढावा,मागदर्शन या पुस्तकातून वाचकांना मिळणार आहे. लेखक प्रोफेसर डॉ. ए. एम. गुरव यांचे हे 42 वे पुस्तक असून ते शिवाजी विद्यापीठाच्या स्तरावर विविध विभागांचे समन्वयक, संचालक म्हणून काम पाहत आहेत.लेखक डॉ. गुरव यांनी शिवाजी विद्यापीठामधून वेगवेगळ्या तीन विषयांमधून आत्तापर्यंत तीन वेळा पीएचडी पदवी मिळवली आहे.शिवाजी विद्यापीठ तसेच राज्यातील इतर अनेक विद्यापीठांच्या तसेच कॉलेजच्या अभ्यास मंडळावरती सदस्य म्हणून त्यांनी काम केले असून त्यांना आजवर अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत.