कोल्हापूर । मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे सोमवारी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या.मराठी नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या शांता तांबे यांनी अनेक नाटकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच मनोरंजन केले होते.शांता तांबे यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
भालजी पेंढारकर,दिनकर पाटील,अनंत माने यांच्यासह अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत शांता तांबे यांनी काम केले.’मोहित्याची मंजुळा’,’मर्दानी’,’सवाल माझा ऐका’,’आई पाहिजे’ ‘बाई मोठी भाग्याची’,’मोलकरीण’,’दोन बायका फजिती ऐका’ अशा चित्रपटांमधुन त्यांनी अभिनयाची छाप सोडली.7 दशकं त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले.त्यानंतर उतरत्या वयामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेतला.त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या.त्या अलीकडेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेत दिसल्या.या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती.