आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी आहारात अनेक जण सलाड घेत असतात.त्यामध्ये उन्हाळा सुरू झाला की भर पडते ती कांद्याची.उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे असल्याने डॉक्टर या दिवसांमध्ये कांदा जास्त खाण्याचा सल्ला देतात.उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही,तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते.
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे अतिशय चांगले मानले जाते. कांद्यात एंटी एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. तसेच उन्हाळ्यासाठी कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात कांद्याचा आहारात समावेश केल्यास उष्माघात टाळता येतो. त्यामुळे कांदे खाण्याचे चांगले फायदे आहेत.
हे होतात फायदे
थंडपणा- कांद्याचा प्रभाव थंड असतो. उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. कांद्यामधील गुणधर्मामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो.
उष्माघातापासून संरक्षण- उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करू शकता. कांद्यामध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे उष्णतेपासून तुमचे संरक्षण होते.
पचन- उन्हाळ्यात पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी कांदा खाल्ल्याने फायदा होतो. तुम्ही सलाड म्हणून कांदा खाऊ शकता. कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो.
प्रतिकारशक्ती – कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, कांद्याचा आहारात समावेश नक्की करा.
मधुमेह- मधुमेहाच्या रूग्णांसाठी कांदा खाणे फायद्याचे मानले जाते. पांढऱ्या कांद्यात आढळणारी क्वेर्सिटीन आणि सल्फर सारखी काही संयुगे मधुमेहविरोधी असतात. ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
कांद्याचे बरेच फायदे आहेत.त्याच्या सेवनामुळे उन्हाळ्यात उष्णता भासत नाही.शरीरात थंडावा राहतो.परंतु याचे सेवन मर्यादेपेक्षा जास्त केले तर हे त्रासदायक होऊ शकतो.
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे .लेखात सुचविलेल्या टीप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहिती देतात.त्यांचा प्रयत्न करण्यापूर्वी,कृपया तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)