हिंदी,मराठी बहारदार गाण्यांची बरसात : इस्लामपुरात रंगला सोहळा
सांगली । गोलमाल रिटर्न,रांजना,प्रेम रतन धन पायो आदी हिंदी चित्रपटांना लोकप्रिय गाणी दिलेली युवा पार्श्वगायिका अन्वेषा दत्ता-गुप्ता हिच्या गोड गळ्याने इस्लामपूरकर कला रसिक गेले भारावून गेले.आविष्कार कल्चरल ग्रुपच्या २१ व्या संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी २१ वर्षाच्या अन्वेषाने ‘लाईव्ह ईन कॉन्सर्ट’मध्ये चार चाँद लगा दिए…विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात ५ हजारच्या वरती कलारसिकांनी या संगीत रजनीचा आनंद लुटला. इस्लामपूरचा सुपुत्र प्रथमेश लाड याने या कार्यक्रमात सुंदर बासरी वादन केले.युवा गायक विशेष जैन काही गाण्यासाठी खास मुंबईवरून आला.
अन्वेषाने जब जग घुमिया,बाहूमे आ जा, बनारसिया,समा आ जाएंगा,ऊ ऊलाला, आजा पिया,ढा-ढा करके,ओठो पे ऐसी बात या हिंदी गाण्यापासून जगण्याला पंख फुटले, मेहंदीच्या पानावर,अप्सरा आली, ए चंद्रा आदी मराठी गाणी सादर केली.तिने मेहंदी च्या पानावर हे मराठी गाणे बंगाली भाषेत अप्रतिम सादर केले.तसेच काही भारतीय क्लासिकल,आणि तेलगू चित्रपट ‘सीतारामन’ मधील प्रसिध्द गाणी सादर केली.विशेष जैन या मुंबईच्या युवा गायकाने केके यांना श्रद्धांजली अर्पण करणारी आखोंमे तेरी अजबसी हवा है,तुमसा नही कोई आदी गाणी सादर केली.
प्रारंभी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार,जेष्ठ उद्योजक सर्जेराव यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन,आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.आविष्कारचे सचिव विश्वनाथ पाटसुते यांनी मान्यवर व कला रसिकांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषणात आविष्कारच्या वाटचालीचा आढावा मांडला.
यावेळी युवा पार्श्वगायिका अन्वेषा दत्ता- गुप्ता हिचा जेष्ठ उद्योजिका स्मिता चितळे,अनंत चितळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच युवा गायक विशेष जैन (मुंबई),प्रथमेश लाड (इस्लामपूर),जेष्ठ संयोजक भगत भाई (मुंबई) यांचाही सत्कार करण्यात आला.
नेताजीराव पाटील,अॅड.बी.एस.पाटील,विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,सुस्मिता जाधव,आर.डी.माहुली,एस.डी.कोरडे यांच्यासह आविष्कार परिवारातील ५ हजारच्यावर कला रसिकांनी या संगीत रजनीचा आनंद लुटला.
मोहनराव चव्हाण,माजी संचालक डी. बी.पाटील,अध्यक्ष सुनिल चव्हाण,माजी अध्यक्ष सतिश पाटील,उपाध्यक्ष भूषण शहा, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील,माजी कार्याध्यक्ष नजीर शेख,डॉ.अतुल मोरे,सचिन पाटील,बाबुराव पाटील,माजी उपाध्यक्ष राजवर्धन लाड,राजेंद्र पाटील,सहसचिव विजय लाड,खजिनदार राजेंद्र माळी,माजी खजिनदार धनंजय भोसले,अजय थोरात,प्रशांत पाटील, विजय नायकल,अभिजित पाटील,आप्पासो जावीर,सूरज कचरे,सौरभ सावंत,प्रताप कवठेकर,सचिन सिंगटे यांच्यासह आविष्कार च्या कार्यकर्त्यांनी २१ व्या संगीत महोत्सवाचे सुंदर संयोजन केले.