-
37 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह तर 14 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या
-
‘क्रीम पोस्टिंग’ पोस्टिंग मिळण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले
पुणे । राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे.राज्यातील ‘महसूल’च्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.राज्यातील पोलीस दलात लवकरच फेरफार होणार असल्याचे समजते.राज्यातील 37 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नत्तीसह नव्या जागी पदस्थापना देण्यात आल्या आहेत.तर 14 अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी निघाले आहेत.
गेल्या मे महिन्यापासून राज्यातील महसूल तसेच पोलीस विभागात व अन्य विभागातील बदल्या रखडल्या होत्या.तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबरअखेरपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली होती.राज्यातील अनेक अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते.एरवी मे महिना हा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कालखंड असतो.पण,आता बदल्यांच्या मुहूर्तासाठी नोव्हेंबर महिना उजाडावा लागला आहे.राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे.राज्यातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना बुधवारी मुहूर्त मिळाला.राज्यातील 37 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नत्तीसह नव्या जागी पदस्थापना देण्यात आल्या आहेत.तर 14 अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलाचे आदेश बुधवारी निघाले आहेत.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्या व अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या.आता लवकरच उपजिल्हाधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदार यांच्याही बदल्या लवकरच होणार असल्याची माहिती मिळत आहे.त्याचबरोबर राज्यातील पोलीस दलात लवकरच फेरफार होणार असल्याचे समजते.पोलीस उपाधीक्षक,सहाय्यक पोलीस आयुक्त,पोलीस निरीक्षक आदींच्या बदल्यांचे आदेश आठवड्याभरात निघण्याची शक्यता आहे.
‘क्रीम पोस्टिंग’ पोस्टिंग मिळण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहे.तशी काहींनी फिल्डींग लावल्याचीही चर्चा आहे.काही अधिकारी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या काही दिवसांपासून बदलीसाठी अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत.काही अधिकाऱ्यांच्या सत्ताधारी गटातील राजकीय नेते मंडळींशी भेटीगाठी सुरु असल्याचीही चर्चा महसूल तसेच पोलीस वर्तुळात सुरु आहे.
महसूल विभागातील पदोन्नती व बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी :
अप्पर जिल्हाधिकारी पदोन्नती पदस्थापना (नियुक्तीचे ठिकाण) असे – श्रीमती प्रज्ञा त्रिंबक बडे-मिसळ (उपयुक्त,रोहयो,विभागीय आयुक्त,नाशिक),प्रदीप प्रभाकर कुलकर्णी (उपायुक्त-पुनर्वसन,विभागीय आयुक्त नागपूर),डॉ. प्रताप सुग्रीव काळे (अपर जिल्हाधिकारी,परभणी),सुहास शंकरराव मापारी (अपर जिल्हाधिकारी,अहमदनगर),मंदार श्रीकांत वैध (उपायुक्त-करमणूक कर,विभागीय आयुक्त कोकण),पांडुरंग शंकरराव कांबळे ( अपर जिल्हाधिकारी,नांदेड),नरेंद्र सदाशिवराव फुलझेले ( अपर जिल्हाधिकारी,वर्धा),श्रीमती रिता प्रभाकर मेत्रेवार (उपायुक्त-पुनर्वसन,विभागीय आयुक्त,कोकण),शिवाजी तुकाराम शिंदे (अपर जिल्हाधिकारी,उस्मानाबाद),सुनील विठ्ठलराव यादव (अपर जिल्हाधिकारी,आंबाजोगाई),सुनील वसंतराव विंचनकर (अपर जिल्हाधिकारी,भंडारा),विजय बिंदुमाधव जोशी (अपर जिल्हाधिकारी,अकोला),श्रीकांत वसंत देशपांडे (अपर जिल्हाधिकारी,चंद्रपूर),दादाराव सहदेवराव दातकार (वन जमाबंदी अधिकारी,कोकण),अजित पंडितराव साखरे (उपायुक्त,रोहयो,विभागिय आयुक्त,कोकण),अनिल रामकृष्ण खंडागळे (अपर जिल्हाधिकारी,गडचिरोली),उत्तम राजाराम पाटील (अपर जिल्हाधिकारी,बीड),मनोज शंकराव गोहाड(अपर जिल्हाधिकारी,मुंबई उपनगर),बाबासाहेब रावजी पारधे (अपर जिल्हाधिकारी,नाशिक)..श्रीमती मंजुषा मिसाकार व तुषार ठोंबरे अपर जिल्हाधिकारी यांच्या पद स्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील.
पदोन्नतीनंतर प्रतिनियुक्तीने पदस्थापना (नियुक्तीचे ठिकाण) असे- डॉ. शिवाजी पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी,एम.आय.डी.सी. मुंबई ), संजय जाधव (अपर जिल्हाधिकारी,सिडको), निशिकांत देशपांडे (अपर जिल्हाधिकारी, मेट्रो रेल्वे मुंबई),श्रीमती मोनिका ठाकूर (सह आयुक्त,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), स्नेहल पाटील (विभाग प्रमुख,बार्टी),श्रीमती सरिता नरके (अपर जिल्हाधिकारी,तथा राज्य संचालक इ -फेरफार प्रकल्प पुणे),श्रीमती मृणालिनी सावंत ( सहयोगी प्राध्यापक यशदा पुणे ),श्रीमती सुषमा सातपुते (प्रकल्प संचालक जलजीवन मिशन बेलापूर ),अरुण आनंदकर (अतिरिक्त आयुक्त मनपा,नाशिक ),वंदना सूर्यवंशी (अपर जिल्हाधिकारी,महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलोपमेंट कंपनी,मुंबई ),उपेंद्र तामोरे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्र ४,एम.आय.डी.सी. मुंबई ),श्रीमती किरण मुसळे (अपर जिल्हाधिकारी,छत्रपती शाहु महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था कोल्हापूर),दत्तात्रेय भडकवाड (सह व्यवस्थापकीय संचालक,दिल्ली मुंबई कॉरिडॉर),सूर्यकृष्णमूर्ती कोतापल्ली (उपसचिव राज्य निवडणूक आयोग),पद्माकर रोकडे (अपर जिल्हाधिकारी, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण),सुभाष बोरकर ( सहसंचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान,मुंबई),हनुमंत आरगुंडे (अपर जिल्हाधिकारी,रस्ते विकास महामंडळ कार्यालय,पुणे),अविनाश कातडे (सह आयुक्त,नागपूर महानगर प्रदेश विकास).
बदली झालेल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची नावे अशी (नियुक्तीचे ठिकाण) – राजेश काटकर (राज्य रसरे विकास महामंडळ,मुंबई),श्रीमतो सोनाली मुळे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्र ३, एम.आय.डी.सी. मुंबई),श्रीमती नीलिमा धायगुडे (सह मुख्याधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण),दत्तप्रसाद नडे (राज्य रस्ते विकास महामंडळ,मुंबई),चंद्रकांत थोरात (सह सचिव विधी,अन्न व औषध प्रशासन),श्रीमती फरोग मुकादम (महाव्यवस्थापक कृषी,उद्योग विकास महामंडळ,मुंबई),श्रीमती रुपाली आवले-डंबे (कार्यकारी प्रशासन,शेती महामंडळ),सोनाप्पा यमगर (अपर जिल्हाधिकारी मेट्रो रेल्वे,पुणे),खुशालसिंह परदेशी (अपर जिल्हाधिकारी, हिंगोली),दिलीप गुट्टे (उपायुक्त रोहयो अमरावती),घनश्याम भूगावकर (उपायुक्त गोसीखुर्द,नागपूर),धनंजय निकम (अपर जिल्हाधिकारी,गाऱ्हाणी निराकरण प्राधिकरण,नंदुरबार),जीवन गलांडे (अपर जिल्हाधिकारी,सातारा),श्रीमती आशा पठाण (अपर जिल्हाधिकारी,नागपूर).