सीईटीच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा
महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या नोंदणीची मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी
मुंबई |
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सोपे जावे यासाठी यंदा तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 03 जून ते 10 जून, 2022 यादरम्यान घेण्यात येणार आहेत.तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 11 जून ते 28 जून 2022 यादरम्यान होणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.
अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक/बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
बीएबीएड, बीएस्सीबीएड – ३ जून
बीपीएड – ३ जून
विधी ३ वर्षे – ४, ५ जून
बीएड – ६, ७ जून
बीएडएमएड – ९ जून
एमएड – ९ जून
एमपीएड – १० जून
विधी ५ वर्षे – १० जून
एमएचटी सीईटी
पीसीएम – ११ ते १६ जून
पीसीबी – १७ ते २३ जून
एमबीए/एमएमएस – २४ ते २६ जून
एमसीए – २७ जून
बीएचएमसीटी – २८ जून
एमएचएमसीटी – २८ जून
एम.आर्च – २८ जून
दृष्यकला पदवी व डिझाईन – १२ जून
महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या नोंदणीची मुदत वाढविली
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहेत. आता उमेदवारांना १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यासाठी ३१ मार्च ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती.
अशी करा नोंदणी
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
होमपेजवरील MHT CET 2022 नोंदणीच्या ‘न्यू रजिस्ट्रेशन’ लिंकवर क्लिक करा.
आता ‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरावा लागेल.
संपूर्ण तपशील भरून आपली नोंदणी करा.
अर्ज फी भरा आणि पुढे जा. फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा.