मुंबई ।
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती होणार आहे.कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिले आहे.महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले होते.
कोणत्या विभागात किती जागा भरणार याबाबत परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यामुळे लवकरच मोठी भरती निघणार आहे.एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी आणि बरोजगार तरुण, तरुणींसाठी ही सर्वात मोठी गूड न्यूज आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिले आहे.यात तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र दिले आहे.
मागणीपत्राचा तपशील असा