Last Updated on 27 Jul 2025 1:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता नागरी सत्कार
महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड
सामाजिक चळवळीतील संघर्षशील नेतृत्वाचा गौरव
सांगली । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी नुकतीच सर्वानुमते निवड झालेले साथी संजय बनसोडे यांचा नागरी सत्कार समारंभ शनिवारी, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता इस्लामपूर येथील बी. के. पॅलेस, मल्टिपर्पज हॉल, ताकारी रोड येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन वाळवा तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या निवडीमुळे परिवर्तनवादी चळवळींमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या नागरी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक व माजी खासदार कुमार केतकर, तर अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य विश्वास सायनाकर हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील असून, सर्व परिवर्तनवादी चळवळींचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संजय बनसोडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन, पुरोगामी विचार आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय योगदान दिले आहे. त्यांच्या या लढाऊ आणि जनजागृतीशील कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्वोच्च पदावर निवड करण्यात आली.









































































