Last Updated on 20 Oct 2021 3:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली :
देशभरात राबविल्या जात असलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना लसीचे ९९ कोटी ५५ लाखांपैक्षा जास्त डोस देण्यात आले आहे. आता गुरुवारी, २१ ऑक्टोबर रोजी भारत एक अब्ज डोसचा टप्पा पार करणार आहे. एका ऐतिहासिक क्षण मोठ्याप्रमाणावर साजरा करण्याची मोदी सरकारने तयारी केली आहे.
थीम साँग लाँच करणार
देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचे यश साजरे करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरु केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केले जाणार आहे. लसीकरणाने 100 कोटींचा आकडा ओलांडताच हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन,मेट्रो स्टेशन,विमानतळ,बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे.याशिवाय समुद्र किनारे आणि जहाजांवर या यशस्वी टप्प्याचं सेलेब्रेशन केलं जाणार आहे.
असा आहे टप्पा
- 16 जानेवारीला कोरोना लसीकरणा सुरुवात
- 1 फेब्रुवारीला एक कोटी डोस पुर्ण.
- 15 जून रोजी 25 कोटी डोस पूर्ण
- 6 ऑगस्ट रोजी 50 कोटी डोस पूर्ण
- 13 सप्टेंबरला 75 कोटी लसींचा टप्पा पूर्ण
- आता शंभर कोटी










































































