Last Updated on 09 Aug 2025 11:32 AM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर पोलीस ठाणे व वाहतूक नियंत्रण शाखा यांची संयुक्त कारवाई
वाहनधारकांकडून अडीच लाखांचा दंड वसूल
इस्लामपूर/विनोद मोहिते
वाहन चालवताना परवाना न बाळगणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या १७४ जणांवर पोलिसांनी आज कारवाई करत अडीच लाख रुपयांचा दंड वसूल केला. इस्लामपूर पोलीस ठाणे व वाहतूक नियंत्रण शाखा इस्लामपूर यांनी संयुक्तपणे कारवाई केली.
शहरात शिराळा नाका व ताकारी नाका परिसरामध्ये पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली.बेजबाबदारपणे वाहन चालवणारे, वाहतुकीचा परवाना नसलेले या कारवाई अलगदपणे अडकले.
पोलीस निरीक्षक संजय हारुगडे म्हणाले,” सर्व वाहनधारकांनी स्वतःचे वाहन चालवण्याचे लायसन्स काढून घ्यावे. वाहन चालवताना हेल्मेट वापरावे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये,वाहतुकीचे नियम पाळावेत.” अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. तसे केल्यास संबंधित नातेवाईकांच्यावर करत कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक हारुगडे यांनी दिला आहे.
लायसन्स न बाळगणे ५०, केसेस सीट बेल्ट न लावणे ३०, ट्रिपल सीट ५०, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे 30 केसेस व अन्य वाहतूक नियमाच्या १६ अशा एकूण १७६ केसेस करून २ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.














































































