Last Updated on 25 Dec 2025 5:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) च्या जनरल सेक्रेटरीपदी तानाजीराव रंगराव खराडे (कापूसखेड), तर कार्याध्यक्षपदी मोहनराव आनंदराव शिंदे (आष्टा) यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष आणि वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) चे अध्यक्ष राजेंद्र बाबुराव चव्हाण (नवेखेड) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संघटने च्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे,तसेच वाळवा तालुका राष्ट्रीय साखर संघ (इंटक) चे सरसिटणीस शंकरराव भोसले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्या त आली. तानाजीराव खराडे यांना संघाच्या कार्याध्यक्ष पदावरून जनरल सेक्रेटरी पदावर,तर मोहनराव शिंदे यांना उपाध्यक्षपदावरून कार्याध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे. या प्रसंगी कामगार प्रतिनिधी व उपाध्यक्ष विकास पवार (कुंडल) सुदाम पाटील (जुनेखेड), सर चिटणीस संजय शेळके (कासेगाव),योगेश पवार (बागणी),खजिनदार सचिन कोकाटे (मालेवाडी) आदी पदाधिकारी व 21 सदस्य उपस्थित होते.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचे विचार आणि कामगार नेते स्व.शंकरराव भोसले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत साखर कामगारांचे हित जपण्याचा,त्यांचे प्रश्न सोडविण्याचा,त्यांच्या सुख – दुःखात सहभागी होण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी भावना नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.














































































