Last Updated on 19 Aug 2025 10:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुंबई शहरात उद्या (दि. २० ऑगस्ट) दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे. पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
मध्य भारतावरील एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत २० ऑगस्टला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल. परंतु काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. १९ ऑगस्टच्या तुलनेत २० ऑगस्टला मुंबई शहरासह मुंबई महानगरातील इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील.
मात्र २० तारखेच्या दुपारपर्यंत काही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे, आणि त्यानंतर पाऊस अजून ओसरेल. २० तारखेला सर्वात अधिक पाऊस पालघर जिल्हा (प्रामुख्याने उत्तर भाग) आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात पडण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र २० ऑगस्टपासूनच पावसाचा जोर ओसरेल असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.
स्रोत : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
Recent Posts
साखर शाळेच्या विद्यार्थ्यांना कृष्णा कारखान्याचा मदतीचा हात
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit ... Read more















































































