Last Updated on 22 Oct 2021 11:38 AM by Sanjay Patil/Adhorekhit
भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे गजबजलेल, सतत धावपळ, प्रंचड वर्दळ असणारे शहर आहे. येथील नागरीक सुट्टीच्या दिवशी शांत ठिकाणी यायचे म्हणून मुंबई बाहेरील ठिकाणांना पसंती देतात. मात्र, मुंबईतही शांत ठिकाण आहे. तर आज आपण या अज्ञात जागे विषयी जाणून घेणार आहोत.
ही अज्ञात जागा आहे. वरळी येथे असणाऱ्या पोद्दार हॉस्पिटलच्या समोर असलेले एक जपानी मंदीर. वरळीकर हे मंदीर जाणून असतील मात्र, मुंबईच्या इतर भागाच्या व मुंबई बाहेरील लोकांना या मंदीराबद्दल सहसा माहित नसेल.

वरळीत वसलेले हे एक बौद्ध मंदीर आहे. जपानच्या बौद्ध भिरखू निचीदात्सू फुजी यांनी 1930 साली या जपानी मंदीराची स्थापना केली होती. भिरखू निचीदात्सू फुजी हे गांधीजींचे मित्र होते. त्यांनी गांधीजींच्या अहिंसावादी स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला होता.

सन 1956 मध्ये ही मंदीराची जागा बिर्ला यांच्या ताब्यात गेली. त्यानंतर मुळ मंदीराच्या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे हे मंदीर उभारले. व त्या मंदीराचे नाव ठेवण्यात आले ‘निप्पोन्झान मायोहोजी बौद्ध मंदीर’.

या जपानी मंदीरात दररोज सकाळी 6 वाजता आणि सायंकाळी 5.30 ते 7 च्या दरम्यान प्रार्थना केली जाते. हे मंदीर अगदीच साध्या धाटणीच आहे. या मंदिरात योग्य स्वच्छता ही ठेवण्यात आली आहे. मंदीरातील भिंतींवर बौद्धांचे चरित्र दर्शवणारे चित्रे आहेत. प्रत्येक शहरात कुठली ना कुठली आकर्षक वास्तु ही दडलेली असतेच. वरळीचे हे जपानी बौद्ध मंदीर याचेच एक उदाहरण आहे. त्यामुळे आता या दुर्लक्षित मंदीराला नक्की भेट द्या.















































































