Last Updated on 11 Mar 2025 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान
नवी दिल्ली : देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत जिथं निर्देश आणि नियमांचं उल्लंघन होईल, तिथं पथकं पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल, असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
हेही वाचा – प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाजाची जबाबदारी आता पोलिस निरीक्षकांवर
केंद्र सरकारनं अलिकडच्या काळात मनरेगासाठी निधी वाटपात लक्षणीय वाढ केली असल्याची माहिती राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी आज लोकसभेत दिली. २००६-०७ मध्ये यूपीए सरकारच्या काळात या योजनेसाठी ११ हजार कोटी रुपयांहून जास्त निधी वाटप झालं होतं. हाच आकडा २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवला गेला आहे. मनरेगा कामगारांची प्रलंबित देयकं लवकरच दिली जातील, असंही पासवान म्हणाले.
Courtesy: Prasar Bharati
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Jan 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन... Read more
















































































