Last Updated on 01 Sep 2025 3:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
खग्रास चंद्रग्रहण
भाद्रपद शु. 15, रविवार, दि .07 सप्टेंबर 2025
गर्भवती व बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती यांनी रविवार दि .07 सप्टेंबर 2025 सायंकाळी.5:15 (PM) पासून सोमवारी 01:27 (AM) पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत.
ग्रहण पर्वकाळ – म्हणजे रविवारी रात्री 09:57 (PM) ते सोमवार 01:27 (AM) या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करु नयेत.
पंचांग आधार – दाते पंचांग सोलापूर
दाते पंचांग गणितानुसार मुंबई येथील ग्रहणस्थिती
(खालील सर्व वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत.)
ग्रहण स्पर्श रात्री 9:57 , संमीलन 11:00 , मध्य 11:42, उन्मीलन 12:27,
ग्रहण मोक्ष सोमवार 01:27(AM),
पर्वकाळ 03:30
ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशिया खंड, अफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका या प्रदेशात ग्रहण दिसेल.
हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसेल.
वेधारंभ – हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरु होत असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे दुपारी 12:37 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत, मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे ही कर्मे करता येतात. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी 5:15 पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.
ग्रहण पर्वकाळ – म्हणजे रात्री 9:57 ते 1:27 या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करु नयेत.
ग्रहणातील कृत्ये – ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन ही कर्म करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणसंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.
पुण्यकाल : ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल आहे.
पंचांग आधार – दाते पंचांग सोलापूर.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)
![]()
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993















































































