Last Updated on 15 Nov 2021 8:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोटा |
नुकताच राजस्थानच्या कोटामधील एका बटाटा व्यापाऱ्याने बीएसएनएलचा व्हीआयपी नंबर खरेदी केला.त्याने २.४ लाखांची बोली लावत हा नंबर विकत घेतला.तसे पाहिलं तर,फोन नंबरसाठी इतकी रक्कम मोजणं आवाक्याबाहेरचे आहे.ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
आपल्यापैकी अनेकजणांमध्ये महागड्या फोनसोबत व्हीआयपी नंबरसाठीही चढाओढ पाहायला मिळते.पण तसे पाहायला गेलो,तर व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबरचा कोणताच अतिरिक्त फायदा होत नाही.पण हे फोन नंबर लक्षात ठेवण्यासाठी सोयीस्कर असते.भारतात बीएसएनएल इतर कंपन्यांच्या तुलनेत तितका आकर्षक ऑपरेटर नाही.पण व्हीआयपी आणि फॅन्सी नंबरसाठी लोकप्रिय आहे.राजस्थानच्या कोटामधील एका बटाटा व्यापाऱ्याने नुकताच बीएसएनएलचा व्हीआयपी नंबर खरेदी केला.२.४ लाखांची बोली लावत त्याने हा नंबर विकत घेतला. तसे पाहिले तर,फोन नंबरसाठी एवढी रक्कम मोजणे आवक्याबाहेरचे आहे.
महागडा मोबाईल नंबर खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे अनुज डूडेजा असे नाव आहे.अनुज हे व्यापारी असून बटाटे विकण्याचा व्यवसाय करतात.अनुज यांना व्हीआयपी नंबर वापरण्याची आवड आहे.लिलावात बोली सरस ठरल्यानंतर बटाटे व्यापाऱ्याने फरुखाबादच्या बीएसएनएल कार्यालयात जाऊन नंबर घेतला. डूडेजा यांचा हा पहिला व्हीआयपी नंबर नाही.यापूर्वीही डूडेजा यांनी व्हीआयपी नंबर विकत घेण्यासाठी १ लाख रुपये मोजले होते. बीएसएनएलच्या वेबसाईटवर अनेक व्हीआयपी नंबर आहेत.
बीएसएनएलचे व्हीआयपी नंबर वेबसाइटवर उपलब्ध आहेत.बटाटे व्यापाऱ्याने व्हीआयपी नंबरसाठी बोली लावली तो नंबर XXX7000000 असा आहे.या नंबरसाठी बोली २० हजारांपासून सुरु झाली होती.एका कालावधीनंतर ही बोली दोन लाखांच्या वर केली सर्वात जास्त बोली कोटाच्या बटाटे व्यापाऱ्याने लावली आणि व्हीआयपी नंबर विकत घेतला,असे वृत्त हिंदी डेलीने दिले आहे.









































































