Last Updated on 26 Jan 2025 10:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अध्यक्ष सयाजी पाटील यांची माहिती : विशाळी यात्रेनिमित्त स्पर्धांचे आयोजन
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील समाज प्रबोधन मंडळाच्या वतीने विशाळी यात्रेनिमित्त २९ जानेवारी रोजी भजनी स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सयाजी पाटील यांनी दिली.
संगीत रागदारी व एकतारी अशा दोन गटात या स्पर्धा होणार आहेत. संगीत रागदारी गटासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाना अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये, आणि ३ हजार रुपये तसेच १ हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षीस आणि कायम शिल्ड तर एकतारी गटासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाना अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये, आणि ३ हजार रुपये तसेच १ हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षीसे तसेच सर्व विजेत्यांना कायम शिल्ड अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘बहे’ची विशाळी यात्रा २९ व ३० जानेवारी रोजी
मंडळाचे उपाध्यक्ष ऋतुराज पाटील, संकेत पाटील, खजिनदार अनुराज पाटील, सचिव गणेश पाटील, अधिकराव आंबी, विवेकानंद पाटील, जालिंदर थोरात, रवींद्र बडवे, केदार पाटील, लखन कोकीळ तसेच मंडळाचे सर्व सदस्य संयोजन करत आहेत.













































































