Last Updated on 17 Oct 2021 2:04 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली :
दहशतवाद आणि तत्सम असामाजिक हालचालिंमध्ये लिप्त असलेल्या सुमारे एक हजारांहून अधिक पेजेस आणि गृप्सवर फेसबुकने बंदी घातली आहे. अशाप्रकरच्या गृप्स आणि पेजेसची यादी लीक झाल्यानंतर फेसबुककडून सदर कारवाई करण्यात आली.
सोशल टेरेरिझम सदरात मोडणारे व्यक्ती, गट आणि पेजेसबाबत फेसबुकला अमेरिकन सरकारकडून यादी मिळाली होती. एका अहवालानुसार,धोकादायक दहशतवादाच्या यादीतील अंदाजे एक हजार नोंदी,एसडीजीटी किंवा विशेषतः जागतिक दहशतवादी घोषित केलेल्या व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. ही यादी ट्रेझरी विभागाने तयार केलेल्या निर्बंधांची यादी आहे. ही यादी 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर तात्काळ जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या निर्देशानंतर तयार करण्यात आली होती.
फेसबुकच्या या यादीमध्ये जागतिक स्तरावर दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या लोकांच्या पासपोर्ट, वैयक्तिक माहिती आणि फोन नंबरचाही समावेश आहे.या याद्या दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये तयार केल्या आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम क्षेत्र आणि समुदायांना सर्वात जास्त दंड लागू केला जातो.साऊथर्न पॉवर्टी लॉ सेंटरने मुस्लिम समुदायाच्या विरोधात द्वेष आणि तिरस्कार पसरवणाऱ्या गटांची यादी जाहीर केली होती. या यादीतील बहुतांशी गटांचा उल्लेख फेसबुकच्या या यादीत नाही.फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर समाजातील कोणत्याही गटाविरोधात द्वेष किंवा तिसस्कार पसरवण्यासाठी करु देत नाही.असा वापर करणाऱ्या गटांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची यादी तयार करण्यात येते आणि वेळेप्रमाणे त्यावर बंदी आणली जाते.










































































