Last Updated on 30 Nov 2021 8:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ आज संपला आहे.कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. मात्र,केंद्राने हा प्रस्ताव स्वीकारला नाही.त्यामुळे सीताराम कुंटे राज्याच्या मुख्य सचिव पदावरुन आज निवृत्त झाले.सीताराम कुंटे हे 1985 च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. कुंटे हे मार्च 2021 पासून राज्याच्या मुख्य सचिवपदी होते.
कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि सरकारमधील मंत्र्यांसोबतचे चांगले संबंध त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही.कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव आता देबाशिष चक्रवर्ती

राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ अखेर संपला आहे.त्यांच्या जागी आता नियोजन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांची निवड करण्यात आली आहे.सिताराम कुंटे यांनी देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे पदाभार सोपवला आहे.
कोण आहेत देबाशिष चक्रवर्ती?
देबाशिष चक्रवर्ती हे 1986 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चक्रवर्ती यांच्या नियुक्तीबाबत 1 महिन्यापूर्वीच प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. चक्रवर्ती यांना 3 महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे. ते फेब्रुवारी 2022 मध्ये निवृत्त होणार आहेत.









































































