Last Updated on 05 Nov 2021 5:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
२०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षाही अधिक व्यावसायिकांच्या आत्महत्या
मुंबई ।
भारतातील लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.सरकारी आकडेवारीनुसारच २०२० मध्ये दरदिवशी तब्बल ३१ चिमुरड्यांनी आत्महत्या केली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातील आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.असं का झालं याबाबत तज्ज्ञांनी अनेक अंदाज वर्तवले आहेत.यापैकी काही जणांच्या मते करोना साथीरोगाच्या काळात लहान मुलांचा वाढलेला ताण हे यामागे कारण आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये तब्बल ११ हजार ३९६ मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.२०१९ मध्ये हीच संख्या ९ हजार ६१३ आणि २०१८ मध्ये ९ हजार ४१३ इतकी होती.२०२० मध्ये मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत १८ टक्क्यांनी आणि २०१८ च्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढले आहे.
मुलांच्या आत्महत्यांची कारणे काय? मुलांच्या आत्महत्येमागील कारणांपैकी प्रमुख कारण कौटुंबिक प्रश्न असल्याचे समोर आले आहे. या कारणामुळे ४,००६ मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.यानंतर दुसऱ्या क्रमांकावर प्रेम प्रकरणातून आत्महत्या हे कारण आहे.यामुळे १,३३७ मुलांनी आत्महत्या केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आजारपणाला कंटाळून आत्महत्या हे कारण आहे.यामुळे १,३२७ मुलांनी आत्महत्या केली आहे.
याशिवाय वैचारिक मतभेद,एखाद्याला नायक समजून आहारी जाणं,बेरोजगारी,कर्जात बुडणे,नपुंसकत्व किंवा वंध्यत्व आणि ड्रग्जच्या व्यसनातून शोषण अशा कारणांचाही समावेश एनसीआरबीच्या या अहवालात करण्यात आला आहे.२४ तास पालकांसमोर घरातच राहिल्याने ताण वाढला काही जाणकारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद शाळा महाविद्यालये आणि २४ तास मुलं घरातच पालकांसमोर असल्यानं तयार झालेला ताण हेही कारण असल्याचे म्हटले आहे.या काळात मुलांचं मित्रांसोबत बोलणं न होणं, शिक्षकांशी संपर्क न होणं,समाजापासून तुटल्यानं हा ताण तयार झाल्याचं त्यांनी म्हटले आहे.
२०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षाही अधिक व्यावसायिकांच्या आत्महत्या
बिघडलेल्या शेतीच्या आर्थिक गणिताने कर्जाबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. असे असतानाच आता छोट्या व्यावसायिकांच्या आत्महत्येचाही प्रश्न गंभीर झाला आहे.२०२० मध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येपेक्षाही जास्त आत्महत्या छोट्या व्यावसायिकांनी केल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार आत्महत्यांची आकडेवारी
देशातील आत्महत्यांच्या एकूण घटनांमध्ये मजुरांच्या आत्महत्या सर्वाधिक २४.६ टक्के असल्याचे NCRB अहवालात सांगण्यात आले आहे.
रोजंदारीवरील मजूर – २४.६ टक्के
गृहिणी – १४.६ टक्के
व्यवसायिक – ११.३ टक्के
बेरोजगार – १०.२ टक्के
नोकरदार – ९.७ टक्के
विद्यार्थी – ८.२ टक्के
शेतकरी – ७ टक्के
निवृत्त नोकरदार – १ टक्के
इतर – १३ टक्के













































































