Last Updated on 06 Apr 2025 3:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या हस्ते आरती
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील राम मंदीरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. संपूर्ण मंदीर फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. स्वागत कमान,भव्य रांगोळी आणि मंदीर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने नटविण्यात आला होता. अतिशय भक्तिमय वातावरण राम नवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे हा जन्मोत्सवही साजरा करण्यात आला.
प्रारंभी युवा कीर्तनकार दादा महाराज येलूरकर यांचे अतिशय सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांना ब्रम्हचैतन्य महिला भजनी मंडळ येलूर, ज्ञानदा बाल भजनी मंडळ येलूर आणि राजारामनगर भजनी मंडळाने उत्तम साथ केली. यानंतर सौ.वैदेही माहुली,संचालिका प्रा.डॉ.योजना शिंदे-पाटील व भगिनींच्या साथीने जन्मोत्सवाचा पाळणा घेण्यात आला.
यावेळी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते आरती करून भाविकांना सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आला. आ.पाटील यांनी भाविकांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रा.शामराव पाटील,विनायक पाटील,बाळासाहेब पाटील,सुस्मिता जाधव, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीप कुमार पाटील, शशिकांत पाटील, संग्राम फडतरे, उदयबापू पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, सुहास पाटील, माजी सभापती शैलजा पाटील, सर्जेराव देशमुख, लालासाहेब वाटेगावकर यांच्यासह कारखाना व समूहातील संस्थांचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी, तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – बहे रामलिंग बेटावर रामनवमी उत्साहात
राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,सचिव डी.एम.पाटील, कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख,सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर,कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,संदीप माळी,संदीप कदम यांच्या सह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केले.

४२ वर्षाची परंपरा कायम!
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या संकल्पनेतून या मंदीराची पायाभरणी करण्यात आली,तर माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी एक आकर्षक व भव्य मंदीर उभारणी पूर्ण केली. गेल्या ४२ वर्षापासून या मंदीरात राम नवमीनिमित्त भव्य श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जात आहे. ही परंपरा प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजही अखंड चालू ठेवण्यात आली आहे.













































































