Last Updated on 29 Nov 2021 3:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोरोना अपडेट । 29 नोव्हेंबर 2021
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 122 कोटी 41 लाख मात्रा देण्यात आल्या
रोगमुक्ती दर सध्या 98.34 टक्के आहे; मार्च 2020 पासूनचा सर्वात उच्चांकी दर
गेल्या 24 तासात 9,905 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,40,08,183 झाली आहे
गेल्या 24 तासात 8,309 नव्या कोरोना बाधितांची नोंद
भारतात सध्या 1,03,859 कोविड सक्रीय रुग्ण, ही गेल्या 544 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
कोविड सक्रीय रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1 टक्केहून कमी असून सध्या हे प्रमाण 0.30 टक्के इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.09%) गेले 56 दिवस हा दर 2 टक्केहून कमी
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.85 टक्के ) गेले 15 दिवस हा दर 1 टक्केहून कमी
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 64 कोटी 2 लाख चाचण्या करण्यात आल्या.
केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 137 कोटींपेक्षा जास्त (1,37,01,65,070) लसींच्या मात्रा राज्ये/केन्द्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.
याशिवाय लसीच्या 24.61 कोटी पेक्षा जास्त (24,61,87,131) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.









































































