Last Updated on 25 Jul 2025 6:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आ.जयंत पाटील यांचा लाईफ टाईम आचिव्हमेंट पुरस्काराने सन्मान
‘राजारामबापू’चे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचा इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्काराने सन्मान
नवी दिल्ली । राज्याच्या सहकार क्षेत्रात गेल्या ४० वर्षा पासून मोलाचे योगदान केल्याबद्दल राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांना देश पातळीवरील “लाईफ टाईम आचिव्हमेंट अवार्ड”या पुरस्काराने,तर अल्पावधीत सहकारी साखर कारखानदारीत आपला वेगळा ठसा उमटविल्याबद्दल राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांना देश पातळीवरील “इंडस्ट्री एक्सलन्स अवार्ड” या पुरस्काराने दिल्ली येथील शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
दि.शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते, असोसिएशनचे अध्यक्ष संजय आवस्थी यांच्या सह देशातील साखर उद्योगातील मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला.

दिल्ली : येथे दि.शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देश पातळीवरील ” इंडस्ट्री एक्सलन्स अवार्ड” हा पुरस्कार स्विकारताना राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील. समवेत असोसिएशनचे अध्यक्ष संजय आवस्थी व मान्यवर
आ.जयंत पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अकाली निधना नंतर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत कारखान्याचा विस्तार केला,एकाच्या चार शाखा केल्या. त्यांनी देशाच्या सहकार क्षेत्रातील पहिला शाखा वाटेगाव येथे सुरू केली. त्यांनी वयाच्या २१-२२ व्या वर्षी गावोगवी पदयात्रा काढून वाळवा तालुक्याच्या शिवारात पाणी आणले आहे. त्यांनी राज्य साखर संघ,राज्य शासन आणि साखर उद्योगातील शिखर संस्था व्हीएसआयच्या माध्यमातून राज्यातील सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान केलेले आहे. ते सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
प्रतीक पाटील यांनी अगदी अल्पावधी काळात साखर उद्योगात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत साखर कारखान्याच्या प्रगतीस गती दिली आहे. त्यांनी देशात सर्वप्रथम आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक ड्रोन उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी शेकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना सुरू केल्या असून ते अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्या साठी प्रयत्नशील आहेत.
आमच्या नेत्यांना देश पातळीवर सन्मानित केल्याचा आम्हास सार्थ अभिमान असून आमच्या राजारामबापू साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे,अशी भावना राजारामबापू साखर कारखाना परिसरात व्यक्त करण्यात आली. कारखान्याचे सभासद शेतकरी,संचालक,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारखाना परिसरात आनंदोत्सव साजरा केला.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Feb 2026 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit सांगली । सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मत... Read more

















































































