Last Updated on 13 Aug 2025 8:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । तुमचे-माझे गेल्या ४० वर्षाचे नाते आहे. आपण जेंव्हा-जेंव्हा संधी मिळेल, तेंव्हा आपण सांगाल ती विकास कामे करून गावांच्या विकासाला चालना दिली आहे. भविष्यातही हा विकासाचा रथ तुम्हाला व मला पुढे घेऊन जायचा आहे, अशी भावना माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी येडेमच्छिंद्र, किल्लेमच्छिंद्रगड, बेरडमाची व लवणमाची आदी गावांच्या संपर्क दौऱ्यात बोलताना व्यक्त केली.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र गावातील अंबामाता मंदीरासमोरील २१ लाख रुपयांच्या सभागृहाचे आ.पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी अँड.संग्राम पाटील यांनी गावातील तालीम दुरुस्त करून राजारामबापू साखर कारखान्या च्या वतीने या तालमीत व्यायामाचे साहित्य मिळावे,अशी मागणी केली. यावेळी विविध विकासकामांची चर्चा करण्यात आली. या प्रसंगी सरपंच वंदना सोनावणे,उपसरपंच अमर पाटील,अजित पाटील,माजी जि.प. सदस्य प्रकाश पाटील,कृष्णेचे संचालक शिवाजी पाटील,माजी संचालक महिपती पाटील,संजय पाटील,डॉ.विश्वास पाटील, अंजना पाटील,भारती पाटील,दीपाली पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
कि.म.गड येथे तानाजी यादव, संग्राम देशमुख, माजी उपसरपंच बाळासो जाधव यांनी गावातील विविध विकास कामे मांडली. माजी पं.स.सदस्य सुनिल पोळ, उपसरपंच संभाजी मदने, विजया पोळ, सुषमा कांबळे, मारुती मोरे, दिनकर कदम यांच्यासह गावा तील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
लवणमाची व बेरडमाची येथेही विविध विकास कामांची चर्चा करण्यात आली. लवणमाची येथे सरपंच छाया दुर्गावळे,उप सरपंच उत्तम डिसले,सुब राव दुर्गावळे, राजकुमार दुर्गावळे, विजय दुर्गावळे, प्रकाश कणप, तर बेरडमाची येथे सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच हरिदास मंडले,अरुण मंडले, बाळासाहेब मंडले, सुभाष मदने, सुभाष पाटोळे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकद दाखवून द्यावी,असे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,आबासाहेब पाटील,प्रशांत रणदिवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.














































































